आमच्याबद्दल

महाराष्ट्रातील नागरिकांना शासनाच्या विविध सेवा सोप्या, जलद आणि पारदर्शकपणे उपलब्ध करून देण्यासाठी ई-सेवा केंद्रे स्थापन करण्यात आली. या उपक्रमामुळे अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुणांना VLE उद्योजक म्हणून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळाली.

परंतु राज्यभर विखुरलेल्या या VLE उद्योजकांना शासन दरबारी योग्य प्रतिनिधित्व मिळत नव्हते — त्यांच्या समस्या, त्यांचे प्रश्न आणि त्यांचा आवाज कुणीही ऐकून घेत नव्हता.

4

न्यायासाठीची लढाई

  • 🛡️ VLE ला शासनाकडून संरक्षण कवच

  • 👨‍👩‍👦 व्यवसाय भविष्यात कुटुंबीयांकडे हस्तांतरण

  • 🏛️ शासनाकडून योग्य मान्यता आणि दर्जा

  • 💼 VLE ला निम्मशासकीय कर्मचारी दर्जा

👉 या मागण्यांसाठी संघटना आज हायकोर्टात न्याय मिळवण्यासाठी लढा देत आहे.
👉 त्यामुळे शासनालाही VLE च्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहावे लागणार आहे.

1

बदलाची सुरुवात

📌 2015 मध्ये अमरावती जिल्ह्यातील विनोद तायडे या होतकरू VLE उद्योजकाने फेसबुकच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील VLE ना एकत्र आणण्याचा ऐतिहासिक प्रयत्न सुरू केला.
📌 राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आणि VLE मध्ये एकता निर्माण होऊ लागली.

5

VLE च्या प्रगतीसाठी आमचे उपक्रम

  • 🏭 औद्योगिक तत्त्वावर राज्यभर प्रशिक्षण कार्यशाळा

  • 💡 व्यवसाय वाढीसाठी नवीन प्रयोग आणि उपक्रम

  • 📊 आर्थिक व सामाजिक स्थिती उंचावण्यासाठी मार्गदर्शन कार्यक्रम

  • 🗳️ शासन स्तरावर प्रभावी प्रतिनिधित्व

2

संघटनेची स्थापना – 2023

VLE च्या अडचणी, समस्या आणि संघर्ष समजून घेतल्यानंतर “अखिलस्तरीय महा ई-सेवा व आधार केंद्र संघटना” स्थापन करण्यात आली.

3

पहिले भव्य अधिवेशन – शिर्डी

✨ शिर्डीत झालेल्या पहिल्या भव्य अधिवेशनात राज्यभरातून 15,000+ VLE एकत्र आले.

📌 हे अधिवेशन VLE इतिहासातील टर्निंग पॉइंट ठरले.
📌 “एकता म्हणजे शक्ती” हे या अधिवेशनाने सिद्ध करून दाखवले.

6
  • 🤝 सर्व VLE ना एकत्र आणणे

  • 🗣️ शासन दरबारी भक्कम आवाज निर्माण करणे

  • ⚖️ VLE च्या हक्कांसाठी संघर्ष करणे

  • 📈 उद्योजकतेसाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन देणे

  • 💼 VLE चे भविष्य सुरक्षित करण्यासाठी कायदेशीर पावले उचलणे

7
  • 🌟 महाराष्ट्रातील प्रत्येक VLE ला योग्य हक्क, सन्मान, मान्यता आणि सार्वभौमत्व मिळवून देणे!
    🌟 VLE उद्योजकांना सुरक्षित, स्थिर आणि अभिमानास्पद भविष्य निर्माण करून देणे.

  •  
Scroll to Top